प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा

माजी आमदार राजन तेली यांची मागणी

⚡कणकवली ता.१८-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी केली.

कणकवलीत आयोजीत पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली बोलत होते. राजन तेली म्हणाले,ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अपशब्द व पातळी सोडून टीका करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आता कारवाईची मागणी करत आहे. मात्र सुरुवात कोणी केली हे त्यांनी तपासण्याची गरज आहे. भाजपाच्या नेत्यांवर टीका करायची मुद्दामहून आरोप करायचे आणि मग प्रसिद्धीच्या झोतात राहायचं अशी खास.संजय राऊत यांची सवय असल्याचा टोला देखील राजन तेली यांनी लगावला. या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा जे काही जण प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी देखील राजन तेली यांनी केली.

You cannot copy content of this page