अवैध दारूवर आंबोली, सातार्डा चेक पोस्टवर कारवाई

२६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

⚡सावंतवाडी ता.१५-: आंबोली व सातार्डा येथे दोन वेगवेगळ्या चेक पोस्टवर केलेल्या गोवा बनावटीच्या दारू कारवाईत एकून २६,५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आ. यात आंबोली येथील कारवाईत १७ हजार ७५० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोलापूर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तर सातार्डा येथे झालेल्या कारवाईत सोनुर्ली येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडून ८ हजार ८४० रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे.

You cannot copy content of this page