बिडिओ परब यांच्याहस्ते झाले उद्घाटन
वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महविद्यालय वैभववाडी व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल वैभववाडी प्रशालेत 50 वें तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात ही प्रा. योगेंद्र चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून न्यूटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमावर आधारित रॉकेट हवेत सोडून उद्घाटन करण्यात आले खेळणी व मनोरंजन अश्या संकलपणेतुन कमी खर्चात व प्रदुषणमुक्त प्रात्यक्षित, सर्वांचे लक्ष वेधुन घेणारे व मनोरंजक ठरले , सर्व विद्यार्थांनी अश्या प्रात्यक्षितून प्रेरणा घेऊन त्यांचा कल विज्ञानाकडे वाढावा व जवळुन विज्ञान कळावे त्याचप्रमाणे यातून प्रेरणा घेऊन स्वत: शास्त्रज्ञ व्हावे व आपले आपल्या शाळेचे,आईवडिलांचे नांव लौकीक करावे अश्या उद्दीष्टातून सरांनी प्रात्यक्षिक दाखविले, त्याबद्दल सरांचे संस्था , शिक्षक, विद्यार्थी व वैभववाडी परीसरातुन खुप कौतुक होत आहे….
