Headlines

नगरवाचनालयाच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

⚡वेंगुर्ला ता.११-: नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेकडे दात्यांनी ठेवलेल्या देणगीतून शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे- अ.ना.शेणई वक्तृत्व स्पर्धा (वेंगुर्ल्याचे स्वच्छता अभियान)-प्रथम-यशराज नाईक (वेंगुर्ला हायस्कूल), द्वितीय-शमिका हुले (दाभोस शाळा), तृतीय-भार्गवराम ओगले (वेंगुर्ला नं.२), स्व.पं.जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा-इ.८वी ते १०वी-विषय – ज्ञानेश्वरी पठण-अध्याय ११वा-१ ते १५ ओव्या – प्रथम-लिखिल हळदणकर (पाटकर हायस्कूल), द्वितीय-किर्ती सावंत (वेंगुर्ला हायस्कूल), तृतीय-सोहम प्रभूखानोलकर, गुड्डी कासारकर (पाटकर हायस्कूल), श्रुती शेवडे (न्यू.इं.स्कूल उभादांडा), भालचंद्र शं.कर्पे सुगमसंगीत स्पर्धा-इ.पाचवी ते सातवी – संतांचे अभंग गायन-प्रथम-अदिती चव्हाण (एम.आर.देसाई स्कूल), द्वितीय-मकरंद वेंगुर्लेकर, तृतीय-नील पवार (वेंगुर्ला नं.२), चतुर्थ-श्रावणी गिरी, पाचवा-कौस्तुभ सावंत (वेंगुर्ला नं.१), भालचंद्र शं.कर्पे सुगमसंगीत स्पर्धा-आठवी ते दहावी-नाट्यगीत गायन-प्रथम-गीता गवंडे (वेंगुर्ला हायस्कूल), द्वितीय-मंदार नाईक (अणसूर-पाल हायस्कूल), तृतीय-राज गावडे (सिधुदुर्ग विद्या.रामघाट), चतुर्थ-जीवन गावडे (न्यू.इं.स्कूल उभादांडा), पाचवा-प्रतिक घोगळे (पाटकर हायस्कूल), सुदत्त कल्याणनिधी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा-आठवी ते बारावी-स्वामी विवेकांनद माझे श्रद्धास्थान-प्रथम-किशोर सावंत (खर्डेकर कॉलेज), द्वितीय-केतकी आपटे (वेंगुर्ला हायस्कूल), तृतीय-रोशनी मोटे (न्यू.इं.स्कूल उभादांडा), चतुर्थ-लक्ष्मण प्रभूखानोलकर, पाचवा-सिद्धेश तेंडोलकर, सुदत्त कल्याणनिधी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा-आठवी ते बारावी-स्वा.सावरकर देशाचे अनमोल रत्न-प्रथम-वैभवी कांबळी (दाभोली स्कूल), द्वितीय-अल्वीरा रॉड्रीग्ज (मदर तेरेसा स्कूल), तृतीय-किर्ती सावंत (वेंगुर्ला हायस्कूल), चतुर्थ-साक्षी तुळसकर (न्यू.इं.स्कूल.उभादांडा), पाचवा-चैत्राली धुरी (पाटकर हायस्कूल).
या स्पर्धांचे परीक्षण अनिल सौदागर, अॅड.देवदत्त परुळेकर, कैवल्य पवार, भाऊ करंगुटकर, प्रा.महेश बोवलेकर, मंगल परुळेकर, माया परब यांनी केले. तर संगीतसाथ गजानन मेस्त्री, अक्षय सरवणकर यांनी केली. यावेळी संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, श्रीनिवास सौदागर यांच्यासह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात होणार असून यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page