कोकण शिक्षक मतदार संघाच्या युतीचे उमेदवार म्हात्रे यांच्यासाठी जोरबैठका सुरू

रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीला सिंधुदुर्गातील राजन तेली, संजू परब, अजय गोंदावळे यांची उपस्थिती
मंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत यांनी घेतलेली बैठक

⚡सावंतवाडी ता.११-: विधानपरिषदेचे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब व सावंतवाडी भाजप मंडळ शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी रत्नागिरी येथील या बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी उदय सामंत व रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page