आडवली मालडी मतदार संघात सर्वाधिक ग्राम पंचायती ठाकरे शिवसेनेकडे

लोकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार;आ वैभव नाईक यांचे सरपंच, उपसरपंच सत्कार प्रसंगी आश्वासन

मालवण, दि प्रतिनिधी
निवडणुकीत ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकत निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचे काम सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी करायला हवे. गावात जी विकासाची आश्वासने दिली ती पूर्ण करणार आहोत. गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आडवली मालडी विभागात जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत. सर्वसामान्य जनता ही उद्धव ठाकरे, शिवसेनेसोबत आहे. येत्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा असरोंडी हायस्कुल येथे झाला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना गौरविण्यात आले. दरम्यान असरोंडी येथील भाजप कार्यकर्ते सुनील सावंत व शिंदे गटाचे सुनील असरोंडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. श्री. नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, विभाग प्रमुख बंडू चव्हाण, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभाग प्रमुख अंबाजी सावंत, अमित फोंडके, शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, माजी सरपंच छोटू गावकर, श्री. सावंत, सातरल सरपंच सविता मेस्त्री, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पाणवलकर, उपसरपंच स्वप्नाली वाळवे, राजू वाळवे, रामगड सरपंच शुभमपरब, माजी सरपंच छोटू गावकर, श्री. सावंत, सातरल सरपंच सविता मेस्त्री, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पाणवलकर, उपसरपंच स्वप्नाली वाळवे, राजू वाळवे, रामगड सरपंच शुभम मठकर, किर्लोस उपसरपंच श्री. लाड, माजी सरपंच बंडू सावंत, शिरवंडेचे रमेश गावकर, हिवाळेचे सचिन परब, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, उपसरपंच संजय पडवळ, बाळा सावंत, असरोंडी सरपंच अनंत पोईपकर, उपसरपंच आदित्य सावंत, आडवली सरपंच संदिप आडवलकर, उपसरपंच सोनाली पराडकर, शाखा प्रमुख दीपक घाडी, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, राठिवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच स्वप्नील पुजारे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page