कळसुली इंग्लिश स्कूलचे लिपिक श्रीकांत कावले यांना कोकनरत्न पुरस्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे लिपिक श्रीकांत कावले यांच्या विविध क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कोकनरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
श्रीकांत कावले हे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. विविध संस्था आणि मंडळाच्या माध्यमातून ते आपले कार्य करीत आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेउन महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी यांच्यावतीने कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते श्रीकांत कावले यांना कोकनरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
ओरोस येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण करण्यात आला. या पुरस्काराबद्दल सर्व संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर तसेच सर्व शिक्षकेत्तर संघटना पदाधिकारी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

You cannot copy content of this page