⚡मालवण ता.२६-: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज, सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मालवण टेबल टेनिस अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या १४ वर्षांखालील मुली गटात आर्या दिघे, वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण आणि डॉन बॉस्को ओरोसच्या १९ वर्षांखाली मुली गटात खुशी पेटे, ख्रिस्तीना फर्नांडिस,मनाली गववाणकर, क्लॅन्सी डिसोजा यांनी विजेतेपद संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये धडक मारली आहे.
तसेच १४ वर्षांखालील मुले गटात जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या गणेश चव्हाण, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर, आदित्य परुळेकर, सर्वेश जैतापकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला असून, रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या १७ वर्षांखालील मुले गटात दिग्गज जाधव, इशांत वेंगुर्लेकर, विराज येरम यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. सर्व सहभागी आणि यशस्वी मुलांचे मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे संचालक विष्णू कोरगावकर तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे सचिव हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.
