⚡कणकवली ता.२६-;.कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर झाले असून या इमारतीचे उद्घाटन नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब , तलाठी लुडबे, नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर,माजी चेअरमन प्रकाश परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे , रामचंद्र लोके,ग्रामसेवक आर.डी .सावंत, परशुराम परब ,उदय परब, संतोष घाडी, रघुनाथ लोके, प्रशांत परब, भालचंद्र हडकर, रमेश परब, देवेंद्र लोके ,ओटव कोतवाल गावकर ,मिलिंद तांबे ,गोविंद लोके ,महेश लोके, सद्गुरू कुबल तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
असलदे गावामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर होण्यासाठी कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते .ते प्रयत्न आज सत्यात उतरले आहेत. स्वतंत्र तलाठी कार्यालय झाल्याने येथील गावातील लोकांना सातबारा आठ व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रामचंद्र लोके गुरुजी यांनी असलदे आरोग्य उपकेंद्रासाठी जागा बक्षीस पत्राने मोफत दिल्याने शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
असलदे येथे स्वतंत्र तलाठी कार्यालयाचे उद्घाटन
