बॉक्सेल पुलाच्या जागी वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे

कणकवलीत घोषणाबाजीने आंदोलनकर्त्यांनी मागणी धरली लावून

⚡कणकवली ता.२४-: कणकवली शहरातील जानवली ब्रिज ते एसएमएस हायस्कूलपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम प्रस्तावित असताना कणकवलीतील बॉक्सेल पुलाच्या जागी वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे या मागणीसाठी कणकवलीतील सर्वपक्षीय नागरिक व विविध सामाजिक संघटना यांनी या मागणी करिता कणकवली शहरातील गांगो मंदिर येथील अंडरपास मध्ये आंदोलन छेडले.

या आंदोलन प्रसंगी जोरदार घोषणाबाजी देत “झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, बॉक्सेल ब्रिजच्या जागी वाय बिंम फ्लाय ओवर झालाच पाहिजे” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आबा दुखंडे यांनी देखील वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिजची मागणी लावून धरली. तसेच ही मागणी मान्य होईपर्यंत बॉक्सेलचे काम करू देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. या आंदोलन प्रसंगी शिवसेना युवानेते संदेश पारकर,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष भूषण परुळेकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, लवु परुळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, विनोद मर्गज, आबा दुखंडे, हरीश उचले, नगरसेवक कन्हैया पारकर, सोमा गायकवाड, कुंदन हर्णे, युवा सेना समन्वयक राजू राठोड, सेवानिवृत्त तहसीलदार रत्नाकर पाटील, मंगेश जाधव, अखिल रगजी, अंजली पाटील, विभावरी रेवडेकर, मिलींद बेळेकर, बाळू पारकर, प्रदीपकुमार जाधव, संजय एकावडे, सतीश सामंत, प्रकाश दळवी, गायत्री परुळेकर, मृणाल परुळेकर, महेश कोदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page