⚡आंबोली ता.२४-: आंबोली सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा १९ वा. वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी प्रांत अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. तर 23 डिसेंबर रोजी काल शाळेचे पॅट्राॅन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून वर्धापन दिनाचा समारंभ करण्यात आला.
आंबोली सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात
