श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन
⚡मालवण ता.२२-: श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट – मालवण येथे २४ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मठाचा ११ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, सकाळी ८.३० वा. पालखी पूजन,
सकाळी १० वा. अक्कलकोट पादुका आणि पालखी मिरवणूक,
सकाळी ११ वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन,
दुपारी १२ वा.भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक स्वामींना नैवेद्य अर्पण,
दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १ वा.
महाप्रसाद अन्नदान,
सायं. ५ वा. सुस्वर भजने,
रात्रौ ९.३० वा. अमृत नाथ दशावतार नाटय मंडळ, गांव- म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
