माडखोल ठाकूरवाडी येथे नाट्य महोत्सव २०२१ चे आयोजन_*
*💫सावंतवाडी दि.०८-:* माडखोल ठाकूरवाडी येथील ओम साई कला क्रीडा मंडळातर्फे नाट्य महोत्सव २०२१ चे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले सिंधुर्गातील कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारे परशुराम गंगावणे यांचा मंडळाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष निलेश ठाकुर, माडखोल सरपंच संजय शिरसाट, माजी सरपंच संजय लाड, ग्रामपंचायत सदस्या आनंदी ठाकूर, लक्ष्मीकांत ठाकूर, कमलाकर ठाकूर, अविनाश ठाकूर, सोमनाथ ठाकूर, मंगेश ठाकूर, मेजर अरुण शिर्के, चेतन गंगावणे, ज्येष्ठ नागरिक शंकर ठाकूर, मयूर गवळी, राजू कलिंगण आदी उपस्थित होते. माडखोल ठाकूरवाडी येथील ओम साई कला क्रीडा मंडळातर्फे दरवर्षी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. मोहन ठाकूर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती परशुराम गंगावणे यांचा ठाकुरवाडीतील ज्येष्ठ नागरिक शंकर ठाकूर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाव अंतरीचे हळवे या गाण्याचे लंगार रचनाकार मयुर गवळी, निलेश ठाकुर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती परशुराम गंगावणे, लक्ष्मीकांत ठाकूर, निलेश ठाकुर, चेतन गंगावणे, अरुण शिर्के यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक अविनाश ठाकुर यांनी तर आभार कमलाकर ठाकुर यांनी मानले. सत्काराच्या कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा ‘शाप प्रतिशाप’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. परिसरातील नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.
