विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत किंगमेकर ठरणार का ? औत्सुक्याचा विषय ठरतोय
⚡सावंतवाडी ता.१३-: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जोरदार रंगत आणली असून विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या पॅनलचे अधिकृत उमेदवार संजना सावंत यांचे पारडे सध्यातरी जड दिसत असून विक्रांत सावंत पुन्हा एकदा माजगाव मध्ये किंगमेकर ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
