मालवणला १८ रोजी जोडी नृत्य स्पर्धा

⚡मालवण ता.११-: मालवण येथील सिंधुदुर्ग कलामंच, या संस्थेच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘खुली जोडी नृत्य स्पर्धा २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या क्रमांकास २१ हजार रु. आणि करंडक, द्वितीय विजेत्या क्रमांकास ११ हजार आणि सन्मानचिन्ह,तसेच तृतीय क्रमांकास ५ हजार आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.

या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यानी अधिक माहितीसाठी विकी जाधव – ९४०४१८६१७६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page