पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उदघाटन

नागपुरात भाषणाची सुरुवात केली मराठीतून : संकष्टी चतुर्थीचा केला आवर्जुन उल्लेख

⚡नागपूर ता.११-: राज्यातील विविध प्रकल्पांच्या ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. मोदींनी यावेळी नागपूरकरांना संबोधित करताना आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि विशेषत: आजच्या संकष्टी चतुर्थीचा आवर्जुन उल्लेख केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

“आज संकष्टी चतुर्थी आहे आणि कोणतंही शुभकाम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो. नागपुरात आज आहोत तर इथल्या टेकडी गणेशाला नमन करतो. गणपती बाप्पाला वंदन करतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आज खुला होत आहे याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

You cannot copy content of this page