जैन बांधवांनी समाजाची संस्कृती, परंपरा जोपासावी

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांचे आवाहन

देवगड(प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैन कासार समाज आणि जैन धर्मियांना संघटित करून गेली वीस वर्षाहून अधिक काळ जैन धर्माची संस्कृती परंपरा व येथील ऐतिहासिक वारसा जोपासण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराने केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय क्षेत्र खारेपाटण तसेच बोर्डवे येथील जिनमंदिर, येथील जैन लेणी या सर्व ऐतिहासिक स्थळांचा जोपासना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैन समाजाने केली आहे.

हेच परंपरा या पुढील काळात या जिल्ह्यातील जैन समाजाने जोपासावी व जैन समाजाचे संघटन व सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जोपासण्याकरता विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांनी कणकवली येथे आयोजित केलेल्या विशेष सत्कार सोहळ्यात व दिनदर्शिका प्रकाशन वितरण प्रसंगी बोलताना केले या वेळी संस्था स्थापना उद्देश,वाटचाल कार्य स्वयंरोजगार विषयी माहिती दिली..
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार यांच्या वतीने अखिल भारतीय दिगंबर जैन कासार समाज संस्था चे अध्यक्ष समाज रत्न पुरस्कार प्राप्त यशस्वी उद्योजक पोपटलाय डोरले व दान चिंतामणी पुरस्कार प्राप्त उद्योगपती विजय उर्फ आण्णा कासार सौ कासार यांचा विशेष सत्कार सोहळा व दिगंबर जैन कासात समाज संस्था २०२३ दिनदर्शिका प्रकाशन ,वितरण सोहळ्याचे आयोजन कणकवली येथे संस्थेचे सल्लागार महावीर मांगले यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यास अखिल भारतीय दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष दयानंद मांगले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश त्रिभुवणे,सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे अध्यक्ष डॉ. दीपक तुपकर, सरचिटणीस दिपराज
बिजितकर, जेष्ठ मार्गदर्शक सल्लागार रविंद्र (भाई) पोकळे,बंडू दंताळ,अशोक ठोबरे ,महावीर मांगले,अनिल खुटाळे,अनंत डोर्ले,अशोक साळवी अभिनंदन दंताळ, बाबू दंताळ प्रा.अरुण नाकील,राजू पिंपळे,श्री व सौ वारे महिला अध्यक्ष पौर्णिमा मांगले, पद्मा दंताळ,आशा खुटाळे, वैशाली मांगले उपस्थित होते.
णमोकर महामंत्र, दिपप्रजवलन,महावीर प्रतिमा पूजनाने या सोहळ्याची सुरूवात झाली.मान्यवरांचे स्वागत प्रास्तविक सिंधुदुर्ग जैन परिवार अध्यक्ष डॉ. दीपक तुपकर यांनी करून जैन परिवाराच्या कार्याचा उपक्रमांचा आढावा घेतला.
या नंतर समाजरत्न पुरस्कार प्राप्त संस्था अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांचा सत्कार शाल श्रीफळ सन्मान चिन्ह,देऊन डॉ दीपक तुपकर यांच्या हस्ते सत्कार,तसेच दान चिंतामणी पुरस्कार प्राप्त विजय उर्फ आण्णा कासार यांचा सत्कार अशोक ठोबरे यांच्या हस्ते सौ कासार यांचा शाल श्रीफळ ओटी भरून महिला पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या निमित्ताने कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यांनी दिगंबर जैन कासार समाज संस्था,संघटन,प्रसार,तसेच संस्थे मार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम ,शिरपूर येथील कासार चिंतन शिबिर,आचार्य
विद्यासागजी महाराज,एलक सिद्धांतसागर महाराजांचे मार्गदर्शन सूचना ची माहिती दिली.
दान चिंतामणी पुरस्कार प्राप्त विजय उर्फ आण्णा कासार यांनी आपल्या मार्गदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैन समाज बांधवांनी कासार समाजाबरोबर सर्व जैन समाजाचे संघटन करून विविध उपक्रम राबवित आहेत.व येथील जैन संस्कृतीचा ठेवा जोपासत आहेत.असे असताना येथील सर्व समाज बांधव सामाजीक शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक कारणास्तव उपेक्षित राहू नये.या करीता विविध उपक्रमातून आर्थिक योगदान दिले जाईल परंतु त्याने स्वतःही स्वावलंबी बनण्याकरिता प्रयत्न करावे.व त्यासाठी दिगंबर जैन कासार समाज संस्था सहकार्य करेल असेही सांगितले.सूत्रसंचालन सौ पद्मा दंताळ व आभार सौ वैशाली मांगले यांनी मानले.
[जैन धर्मियांची संस्कृती ,ऐतिहासिक वारसा सिंधुदुर्ग जैन कासार समाज व जैन परिवाराने जतन केला-पोपटराव डोर्ले

You cannot copy content of this page