तर रांगोळी स्पर्धेत शिरोडा येथील भावना नाबर प्रथम;दत्तजयंती निमित्त स्वयंभू श्री देव औदुंबर दत्तमंदिर तिरोडा – बामणवाडीच्यावतीने आयोजन
⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ -: श्री दत्तजयंती निमित्त स्वयंभू श्री देव औदुंबर दत्तमंदिर तिरोडा – बामणवाडी आयोजित भजन स्पर्धेत कसाल येथील नादब्रह्म भजन मंडळाने
व रांगोळी स्पर्धेत शिरोडा येथील भावना रणजीत नाबर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
दत्तजयंती निमित्त आयोजित भजन व रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
भजन स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक नादब्रह्म भजन मंडळ, कसाल बुवा (श्री.सुंदर मेस्त्री), व्दितीय क्रमांक स्वरधारा भजन मंडळ तांबोळी (बुवा श्री अमित तांबोळकर), तृतीय क्रमांक
वेताळ भजन मंडळ तुळस (बुवा श्री.मंदार नाईक) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थ
उमळकर भजन मंडळ, कुडाळ (बुवा श्री.अमित उमळकर), श्री सदगुरूनाथ भजन मंडळ तुळस बुवा श्री.सिध्देश नाईक, श्री देवी भवानी भजन मंडळ न्हावेली (बुवा अक्षय जाधव) यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट गायक
बुवा श्री सत्यनारायण करगुंटकर (श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली), उत्कृष्ट हार्मोनियम
बुवा श्री नरेंद्र बोंद्रे (श्री देव साटम महाराज भजन मंडळ निरवडे), उत्कृष्ट पखवाज
बुवा श्री सिध्देश मेस्त्री (नादब्रह्म भजन मंडळ कसाल), उत्कृष्ट कोरस श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त), उत्कृष्ट झांज श्री.गौरव नाईक (श्री देव मुसळेश्र्वर भजन मंडळ) मळेवाड यांना मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. श्रीराम दीक्षित व महेंद्र पिंगुळकर यांनी काम पाहिले. रांगोळी स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक -सौ. भावना रणजीत नाबर, शिरोडा, व्दितीय क्रमांक कुमारी दुर्वा पांढरे आजगांव तृतीय क्रमांक सेजल कुडव आरवली तर उत्तेजनार्थ सौ.अनुराधा वराडकर, आजगाव, प्रज्योत हरजी, शिरोडा यांना देण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
