शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन
⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ- : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ कणकवलीच्यावतीने कणकवली कॉलेज येथे रविवार २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन वर्गासाठी पुणे येथील अमोल नवलपुरे, किसन चौधरी व कल्याण कडेकर आदी शिष्यवृती संदर्भात मार्गदर्शनाचा दीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ मार्गदर्शक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती व पालकांसाठी स्वतंत्र असे तीन वर्ग असून गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे मार्गदर्शन होणार आहे. संस्थानतर्फे घेतली जाणारी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव प्ररीक्षा यावर्षी २२ जानेवारी २०२३ रोजी कणकवली व सावंतवाडी अशा दोन परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. प्रवेश वर्ग २५ डिसेंबर पासून स्विकारले जातील. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या जास्तीत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून या जिल्हास्तरीय मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस संस्थान भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सेक्रेटरी अशोक सापळे, संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर (९४२१२३८९२५), शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर (९५६१३४७५२५) व शैक्षणिक मंडल सदस्य यानी केले आहे.
