एकेरीत वाडकर, उस्केकर, वेंगुर्लेकर, दिघे तर दुहेरीत वेंगुर्लेकर, जाधव विजेते

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचा निकाल जाहीर

⚡मालवण ता.२८-: इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकेरीत गौतम वाडकर, साईशा उस्कैकर, इशांत वेंगुर्लेकर, आर्या दिघे तर दुहेरीत इशांत वेंगुर्लेकर-दिग्गज जाधव विजयी ठरले.

ही स्पर्धा मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये संपन्न झाली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – १५ वर्षाखालील मुली – विजेती आर्या दिघे, उपविजेती प्राची चव्हाण; उपांत्य फेरी दुर्वा चिपकर ,वर्षा परुळेकर. १५ वर्षांखालील मुले – विजेता इशांत वेंगुर्लेकर,उपविजेता आधिश पेडणेकर;उपांत्य फेरी -अनुज चव्हाण,प्रत्युष शेट्टीगार. महिला एकेरी – विजेती साईशा उस्कैकर
,उपविजेती खुशी पेटे; उपांत्य फेरी -आर्या दिघे,पावनी मालणकर. पुरुष एकेरी – विजेता गौतम वाडकर, उपविजेता अतुल गवस;उपांत्य फेरी -इशांत वेंगुर्लेकर,सुजन परब. दुहेरी -विजेते इशांत वेंगुर्लेकर आणि दिग्गज जाधव; उपविजेते – गौतम वाडकर,शुभम् मुळीक, चंद्रकांत साळवे,सुजन परब,साहिल पारकर,अतुल गवस.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ किरण पिंगुळकर, शशांक घुर्ये, नितीन तळेकर, हेमंत वालकर, डॉ. अश्विन दिघे यांच्या हस्ते संपन्न झाला. पारितोषिक वितरण समारंभाला टे.टे.खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लक्ष्मण मेस्त्री, सुजन परब, चंदू साळवे, आयुष तपकिरकर यांनी खूप मेहनत घेतली. स्पर्धेसाठी पंच म्हणून खूशी पेटे, साईशा उस्कैकर, पावनी मालणकर आणि आयुष तपकिरकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल स्पर्धेचे आयोजक विष्णू कोरगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page