⚡मालवण ता.२८-: मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
यावेळी प्रास्ताविक करताना प्रा. बी.एच. चौगुले यांनी संविधानाची निर्मिती, महत्व, रचना याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांनी संविधानिक कर्तव्ये हि संविधानिक अधिकारा इतकीच महत्वाची असून प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे, तसेच बंधुत्व व राष्ट्रीय एकत्मता जपण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संग्रामसिंह पवार यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मिनल सामंत यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
