मेडिकल कॉलेजचे डीन डॉ मोरे यांची उचलबांगडी

डॉ प्रकाश गुरव यांच्याकडे पदभार

⚡ओरोस ता.२५-: सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कारभार हाकताना अनियमितता राहिल्याचा फटका डॉ सत्यवान मोरे यांना बसला आहे. डॉ मोरे यांची शासनाने उचलबांगडी केली असून जळगाव येथील येथील शासकीय विद्याकिय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाच्या प्राध्यापक या मूळ नियुक्तीच्या जागी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शल्य चिकीत्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ प्रकाश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गतवर्षी सुरू झाले आहे. यावर्षी दुसऱ्या तुकडीचा प्रवेश झाला आहे. या वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता पदी डॉ सत्यवान मोरे यांची शासनाने नियुक्ती केली होती. नियुक्ती केल्यानंतर मान्यता मिळण्यासाठी तपासणीसाठी केंद्रस्तरीय आलेल्या समितीला आवश्यक पूर्तता करून देण्यास अधिष्ठाता म्हणून डॉ मोरे कमी पडले होते. त्यानंतर महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य खरेदी करताना व कर्मचारी नियुक्त करताना प्रशासकीय बाबी पूर्ण न करता प्रक्रिया राबविली होती. त्यामुळे अनियमित कारभार सुरू असल्याचा आरोप प्रशासनावर झाला होता. याबाबत मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आवाज उठविला होता. तर मनसेने वैद्यकीय विभागाचे राज्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सचिव यांनी तीन सदस्य समिती नियुक्त करीत प्रशासकीय चौकशी करून घेतली आहे.
त्यानुसार डॉ मोरे यांची उचलबांगडी करून त्यांना जळगाव येथील मूळ आस्थापनेवरील पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. २३ नोव्हेंबर रोजी शासनाने हे आदेश काढले आहेत. तर नवीन अधिष्ठाता डॉ गुरव यांच्याकडे तात्काळ पदभार सुपूर्द करून आपल्या मूळ आस्थापनेवर हजर होण्याचे आदेश डॉ मोरे यांना या आदेशात देण्यात आले आहेत. एकंदरीत अधिष्ठाता डॉ मोरे यांना सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातील भोंगळ कारभार भोवला असल्याची चर्चा सुरू आहे.

You cannot copy content of this page