अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सावंतवाडीत*
⚡सावंतवाडी ता.२५-:
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सावंतवाडीत येणार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांच्या लग्न स्वागत समारंभ सोहळ्याला ते उपस्थिती दर्शवणार आहेत. “त्या” पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा कामाला लागली असून अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वागत समारंभ असलेल्या जिमखाना येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी करत नियोजनाचा आढावा घेतला.
रात्री ९ वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येथील उपस्थित राहणार आहेत.
