कणकवली येथे 27 नोव्हेंबर रोजी वितरण सोहळा
⚡कणकवली ता.२४-: कणकवली येथील सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा सन 2022 साल चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.27 नोव्हेंबर रोजी कणकवली नगरवाचनालय सभागृहात सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे येथील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल तुकाराम जाधव यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार असून वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि.प.उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, सचिव शुभांगी पवार यांनी केले आहे.
