बालसंस्कृत वर्ग शाळा व वैश्य समाज आयोजित कार्यशाळेचे उदघाटन

⚡कणकवली ता.११-: आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित कार्यशाळेचे उदघाटन नुकतेच वैश्यसमाज हॉल (धडाम घराच्या समोर)(पटकी देवी मंदिराजवळ) वैश्य समाज कणकवली अध्यक्ष दादा कुडतरकर, महेंद्र मुरकर,सौ नीलम धडाम, दिशा अंधारी,काणेकर, माणगावकर, सातवसे,कोदे आदीच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वर्गामध्ये वयोगट तीन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे
या वर्गामध्ये विद्यामंदिर शाळेचे संस्कृत शिक्षक श्री. वझे बालचमुना संस्कृत श्लोक संस्कृत शब्द शिकविणार आहेत .तरी मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी या दिवशी हजर राहून या वर्गाची शान वाढवायची आहे. हे वर्ग दर शनिवारी घेण्यात येणार आहेत
मुलांना आपली प्राचीन संस्कृती याबद्दल आपुलकीच नव्हे,तर अभिमान वाटावा, आपली धार्मिक तत्वे, वैदिक संस्कृती, आपली परंपरा, सण, धर्मग्रंथ, रामायण, महाभारत मधील महानता संत वाडमय यांचे ज्ञान या वयातच होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे .मुलांना या संस्कार वर्गात प्रवेश नोंदणी करून संस्कृत भाषा विकसित व्हावी व जोपासावी यासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन आदिशक्ती महिला समिती अन वैश्य समाज,कणकवली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page