*💫सिंदुर्गनगरी,दि.०४-:* नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे ५ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. ५ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० वा. पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी १०३० ते दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी, संबंधित मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या समवेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीअंतर्गत एकत्रिक विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास यंत्रणा कामांचा आढावा, दुपारी १२ ते १२.१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद, दुपारी १२.१५ ते १.१५ सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, येथे राखीव, दुपारी १.१५ ते १.४५ वा. शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्ग येथे राखीव, दुपारी १.४५ वा. शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी २ वा. पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस येथून खासगी हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण.
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर
