नांदगांव च्या विविध समस्यांसाठी आम.नितेश राणे यांची भेट

आठ दिवसाची अधिका-यांना दिली मुदत.

*💫कणकवली दि०४-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील हायवे कांमामुळे नांदगाव ग्रा.पं.च्या नळपाणी योजनेचे काम रखडले असून तसेच सर्व्हीस रस्त्याचा गंभीर प्रश्न अशा प्रश्नांची आम.नितेश राणे यांनी नांदगाव येथे प्रत्यक्ष येत पाहणी करून हायवे प्राधिकरणाच्या अधिकारी तसेच के.सी.सी.कंपनीला सुचना देत येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण झालच पाहीजे अशी ताकीद दिली.व विविध समस्यां विषयी चर्चा केली . नांदगाव येथे गेले काही वर्ष हायवेच्या कामांमुळे नळयोजनेवर विपरीत परिणाम होवून पाण्याचा मुबलक प्रश्न निमार्ण झाला होता.कित्येक वेळा पाठपुरावा करून ही समस्या सुटत नव्हती तेव्हा याबाबत येथील आमदार नितेश राणे यांनी आज नांदगाव येथे प्रत्यक्ष येत पाहणी केली व अधिकारी वर्गाला खडे बोल सुनावून येत्या आठ दिवसात इलेक्ट्रीक केबल व नळपाईप लाईन अलग करून समस्या सुटली पाहीजे पाणी हा माणसाचा जीव्हाळयाचा प्रश्न आहे तुम्ही रस्ता करताना मुलभूत गरजाच कमकूत केलात येथील शेतकरी वर्गाची जमिन गेली म्हणून हा रस्ता होत आहे तेव्हा तेव्हा यांच्या समस्यांकडे दुलर्क्ष करू नका .तसेच कामे चांगल्या दर्जाची करा तुम्हाला काही अडचणी व केंद्रातील प्रस्तावासंदर्भात काही असेल तर आम्हाला सांगा आमची मदत घ्या आम्ही राणे साहेबांच्या मार्फत शिफारस करून सूमस्या सोडवू शकत असल्याने तुमच्या अडचणी आमच्या पर्यंत पोहचवा पण अशा मुलभूत गरजा तातडीने सोडवा अशा सुचना अधिकारी वर्गाला केल्या. तसेच नांदगाव सरपंच तसेच पदाधिका-यांना सुचना केल्या की ठेकेदार कंपनी येथून जाण्या अगोदर कामे चांगली करून घ्या यासाठी कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचना यावेळी दिल्या . यावेळी सभापती मनोज रावराणे,नांदगाव पं.स.सदस्या हर्षदा वाळके,नांदगाव शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर ,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर ,उपसरपंच निरज मोरये,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,नांदगाव माजी सरपंच संजय पाटील ,नांदगाव ग्रा.पं.सदस्य मच्छीद बटवाले, गवस साठविलकर ,मंगेश पाटील ,सुनिता साळुंखे,ईशा बिडये,रेणूका पाटील ,रमिजान बटवाले,कमलेश पाटील ,राजू खोत,प्रमोद पाटील ,रज्जाक बटवाले,ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर ,उपअभियंते खारेपाटण चे श्री डी.जी.कुमावत,के.सी.सी.कंपनी व्यवस्थापक आदी गावातील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थीत होते.

You cannot copy content of this page