*अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास तीन वर्षाचा कारावास

*अँड. रुपेश देसाई यांनी पाहिले काम

सिंधुदुर्गनगरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील अजित अर्जुन देसाई याला आज येथील जिल्हा न्यायालयाने तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे. सदर घटना ही २७ फेब्रुवारी २०१८ ला घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित पीडित मुलगी ही शाळेत जात असताना संशयित देसाई हा तिच्या पाठीमागून येऊन त्याने विनयभंग केला होता अशी तक्रार संबंधित मुलीने केली होती. त्यानुसार नऊ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या साक्षी मध्ये संबंधित संशयिता विरोधात ठोस पुरावे आढळून आल्यामुळे त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

You cannot copy content of this page