भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा इशारा_
*💫कणकवली दि.०४-:* कणकवली शहरात बेकायदा सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये पैसे लावून जुगार खेळला जात असून याकडे केल्या जात असलेल्या दुर्लक्षाविरोधात १६ फेब्रुवारीपासून कणकवली पोलीस ठाण्यासमोर उपोषण छेडण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांना दिला आहे. भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनधिकृत व्हिडीओ गेम पार्लरबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेत उपजिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना जिल्ह्यातील अवैध व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगारसदृश्य खेळ सुरू असल्यास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिडीओ गेम पार्लरची यादी देत तिथे जुगारसदृश्य खेळ खेळले जात असल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व व्हिडीओ गेम पार्लरमध्ये पैसे लावून जुगार खेळले जात आहेत. मात्र या जुगाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. कणकवली शहरातील व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई करून गुन्हे दाखल न केल्यास पोलीस ठाण्यासमोरच उपोषण छेडणार असल्याचा इशारा नगरसेवक परुळेकर यांनी दिला आहे. आता पोलीस यंत्रणा काय कारवाई करते याचीच कणकवलीवासीयांना उत्सुकता आहे.
