अखेर सातार्डा-पाडलोस-सावंतवाडी एसटी सुरू

*💫बांदा दि.०४-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी (वस्तीची गाडी) एसटी बस वाहतूक सेवा नागरिकांसह विद्यार्थ्यांची वाहतुकीची होणारी अडचण पाहून दूर करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते. पाडलोस रवळनाथ मंदिराजवळील बस थांब्याकडे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच अक्षरा पाडलोसकर तर ग्रामस्थांच्यावतीने आनंद गावडे यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक, पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, ग्रामस्थ अमेय गावडे, श्रीधर परब, बबलू नाईक, रोहन सातार्डेकर, भीमसेन माधव, जयराम गावडे, बापू माधव, गिरीश येडवे, पूजा येडवे, संतोष आंबेकर, मनोज माधव तर केणीवाडा येथे तुळशीदास नाईक, अक्षय जाधव, आर्यन केणी, एकनाथ कुबल, भूषण केणी, सिद्धेश कोरगावकर आदी उपस्थित होते. सातार्डा ते सावंतवाडी दरम्यान अनेक गावांतील नागरिकांना सकाळ व संध्याकाळच्यावेळी घर गाठणे किंवा कामासाठी बाहेर पडणे कठीण होत होते. त्यामुळे पाडलोस ग्रामपंचायतने सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र देऊन सदर गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. सावंतवाडीतील सातार्डा, साटेली, आरोस, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, रोणापाल, मडुरा, शेर्लेसह बांदा, इन्सुली माजगावातील नागरिकांना सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी या वस्तीच्या गाडीचा मोठ्याप्रमाणात उपयोग होणार आहे. आरोससारख्या ठिकाणी सावंतवाडीवरून जाण्यायेण्यासाठी एसटीवाहतूक सेवा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, सावंतवाडी आगार व्यवस्थापकांनी ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेत सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी गाडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन बुधवारपासून सावंतवाडी पाडलोसमार्गे सातार्डा एसटी गाडी सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page