जिल्ह्यात काँग्रेसला महाविकास आघाडी सरकार किंमत देत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वतंत्र लढेल

*कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा इशारा*

*💫सावंतवाडी दि.०४-:* अच्छे दिनाचे स्वप्र दाखवून, खोटी आश्वासन देऊन मोदी सरकार आज सत्तेवर आले असून, त्यानी लोकांची फसवणूक केली आहे. मोदींचा रुपात दुसरा हिटलर सत्तेत आला असून, देशात हिटलर शाही येणार असल्याचा हल्लाबोल काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आयोजित युवक कॉंग्रेस मेळाव्यात मोदी सरकारवर केला आहे. मोदी सरकारने देशाला पांगळे करण्याचे काम केले असून, भाजपच्या काळात एकही गरीब श्रीमंत झालेला दिसून आला नाही. देशात महागाईने कहर केला असून, मोदी सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघ हा कॉंग्रेसच्या वाट्याला यावा अशी त्यानी मागणी केली असून, जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी जोमाने काम करून एक नंबरचा पक्ष केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जर कॉंग्रेसला जिल्ह्यात किंमत देत नसेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस सर्व जागांवर स्वतंत्र लढेल आसा इशारा देखील दिला आहे.

You cannot copy content of this page