जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत दूर्वा, दिक्षा व नेहा यांचे यश

⚡वेंगुर्ला ता.२९-: हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात दूर्वा पावसकर, मोठ्या गटात दिक्षा नाईक तर खुल्या गटात नेहा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविले.

  येथील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्यावतीने २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत दिपावली शो टाईमचे आयोजन केले होते.  दि.२५ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात दुर्वा पावसकर (प्रथम), काव्या गावडे (द्वितीय), आरव आईर (तृतीय), आरुषी मांजरेकर (उत्तेजनार्थ), मोठ्या गटात दिक्षा नाईक (प्रथम), सोहम जांभोरे (द्वितीय), नंदिनी बिले (तृतीय), तन्मय आईर (उत्तेजनार्थ) तर खुल्या गटात नेहा जाधव (प्रथम), समर्थ गवंडी (द्वितीय), पूजा राणे (तृतीय) व ईशा गोडकर (उत्तेजनार्थ) यांनी क्रमांक पटकाविले.

  स्पर्धेचे परिक्षण रेश्मा वरसकर, शेजल गावडे, रामा पोळजी, भक्ती जामसंडेकर व प्रणाली कासले यांनी केले. तर सूत्रसंचालन नागेश नेमळेकर व योगेश गोवेकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
You cannot copy content of this page