पालकमंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधणार;बांदा विकास सोसायटी उपाध्यक्ष राजाराम सावंत यांची माहिती
बांदा/प्रतिनिधी
शासनमान्य रास्त धान्य दुकानात ऑनलाईन धान्य वितरण करण्यासाठी अनेक त्रुटी असल्याने याचा नाहक फटका लाभार्थ्यांना बसत आहे. गेली ४ दिवस दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहूनही धान्य मिळत नसल्याने शासनाने ऑफलाईन धान्य वितरण करण्यासाठी उपाययोजना करावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी सांगितले.
महिन्याच्या अखेरीस आनंदाचा शिधा यासंह महिन्याचे धान्य वितरण करण्यात येते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांची धान्य घेण्यासाठी झुंबड उडाल्याने व ऑनलाईन धान्य वितरण करण्यासाठी अनेक त्रुटी निर्माण झाल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. गेली ४ दिवस हा प्रकार सुरु आहे. उद्या महिन्याचा अखेर असल्याने ऑनलाईन त्रुटीमुळे धान्य वितरण करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अनेक विकास सोसायटीना स्थानिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी शासनाने ऑफलाईन धान्य वितरण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.
फोटो :-
बाळू सावंत.