साद फाउंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना शिधा वाटप

⚡बांदा ता.२९-: आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते एल. एम. नाईक स्मृती प्रित्यर्थ “साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त शिधा वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी तथा साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक,खजिनदार गौरेश नाईक, लतिका नाईक आणि कुडाळ नगरपंचायत करविभाग प्रमुख रचना कोरगावकर, स्वप्नील पाटील, संदीप कोरगावकर, विजय खरात आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सफाई कर्मचारी वर्ग हा कंत्राटी कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत असतो. अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी आपल एक सामाजिक दायित्व असते त्या अनुषंगाने वडिलांच्या स्मरणार्थ कुडाळ नगरपंचायतच्या जवळपास 40 सफाई कर्मचाऱ्यांना तांदूळ, डाळ, साबण आणि मिठाई वाटप नगरपंचायतच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आल्याची माहिती साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांनी दिली.

You cannot copy content of this page