अशोक स्तंभ आणि नारायण राणे यांचा अवमान

दोषींवर कारवाई करण्याची भाजपा युवा मोर्चाची पोलिसांकडे मागणी

⚡कुडाळ ता.२८-: केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावे अशी मागणी कुडाळ भाजपा युवा मोर्चाने आज कुडाळ पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तेंडुलकर, सरचिटणीस रुपेश बिडये,जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर,सोशल मीडिया युवा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर,सोशल मीडिया ता संयोजक राम बांदेलकर,प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page