विशाल परब यांचे श्री देव रामेश्वराला साकडे
⚡मालवण, दि-२७ :- मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्याची मालवण बाजारपेठ भक्तिमय झाली होती. भाजपचे युवा नेते विशाल परब यानी श्री.देव रामेश्वर पालखीचे दर्शन घेत आपले प्रेरणास्थान भाजपचे नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मधून आमदार म्हणून निवडून येऊ देत. अशा पद्धतीचे साकडे रामेश्वराला घातले आहे.
यावेळेस पालखी सोहळ्याने बाजारपेठ गजबजून गेली होती.दिवाळी पाडवा व भाऊबीज या द्विगुणित आनंदात अतिशय भक्तीमय वातावरणात हा पालखी सोहळा संपन्न झाला.भाविकासह सर्वच पक्षाच्या प्रमुख राजकीय नेते व पदाधिरांनी दर्शन घेत रामेश्वराला साकडे घातले
