सातार्डा येथे आढळला ग्रीन सॅमेलियन जातीचा सरडा
पत्रकार संजय पिळणकर यांनी दिले जीवदान

⚡सावंतवाडी ता.२७-: : तालुक्यातील सातार्डा येथे भर रस्त्यात एक हिरव्या रंगाचा सरडा रांगत जात होता.यावेळी रस्त्यावरून बरीच वाहने ये-जा करत होती.त्यावेळी तेथून प्रवास करतांना पत्रकार संजय पिळणकर यांच्या ती बाब लक्षात येताच त्यांनी वाहनांना थांबवून त्या दुर्मिळ सरड्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.

यावेळी ये – जा करणाऱ्या वाहन धारकांनी वाहने थांबवून संजय पिळणकर यांना सहकार्य केले.
दरम्यान त्या दुर्मिळ सरड्याचा व्हिडीओ व फोटो वनधिकारी क्षीरसागर व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचे उपाध्यक्ष डुमिंग डिसोझा यांना पाठवला असता,त्यांनी दुर्मिळ जातीचा ग्रीन सॅमेलियन जातीचा सरडा असून त्याला ‘फरुड’ असेही म्हटले जात
असल्याबाबत पुष्टी दिली.

You cannot copy content of this page