उगवे गोवा येथील ओम बॉईजचा नरकासुर ठरला प्रथम

सागर सावंत मित्रमंडळाच्या नरकासुर स्पर्धेला मोठा प्रतिसाद

बांदा ता.२५
येथील सागर सावंत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत बांदा शहरासह गोवा राज्यातील व ग्रामीण भागातील तब्बल पंधराहून अधिक नरकासुर सहभागी झाले होते. या स्पर्धेत उगवे गोवा येथील ओम बॉईजच्या नरकासुराने प्रथम क्रमांक मिळविला.
सरमळे पेडणे गोवा येथील माऊली स्पोर्ट्स क्लबच्या नरकासुराने द्वितीय क्रमांक, काळोबा राष्ट्रोळी युवा मंडळ पराष्टे गोवा यांच्या नरकासुराने तृतीय क्रमांक मिळविला. एस के बॉईज बांदा, आदर्श नगर तांबुळी व राजेंद्र कासकर मित्रमंडळ पत्रादेवी गोवा यांच्या नरकासुर प्रतिमांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण रणजित बांदेकर, केदार कणबर्गी यांनी केले. येथील श्री बांदेश्वर मंदिर चौकात झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, आबा धारगळकर, गजानन गायतोंडे, सुधीर साटेलकर, सुनील धामापूरकर, रेश्मा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धेकांना रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
स्वागत सागर सावंत यांनी केले. सूत्रसंचालन नितीन नाईक, जय भोसले, राकेश परब यांनी केले.
या स्पर्धेत एकाहून एक सरस अक्राळविक्राळ नरकासुर सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या स्पर्धेत नरकासुर पाहण्यासाठी बांदावासियांनी मोठी गर्दी केली होती. अक्षय मयेकर, सर्वेश मुळ्ये, गौरांक साळगावकर, गुरुनाथ साळगावकर, अजय तारी, युसूफ शेख, समीर सावंत, स्वप्नील सावंत, भाई म्हाडगूत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
फोटो :-
बांदा येथे आयोजित नरकासुर स्पर्धेत सहभागी झालेले नरकासुर.
फोटो :-
बांदा शहरात नरकासुर बनविण्याच्या स्पर्धेत अक्राळविक्राळ नरकासुर लक्ष वेधून घेत होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे दहन करण्यात आले. (छायाचित्रे – निलेश मोरजकर

You cannot copy content of this page