व्यायाम, सुदर्शन क्रियेमुळे जीवनात येते नवचैतन्य

धनाजी नाईक यांचे प्रतिपादन

वैभववाडी संजय शेळके
बलवान शरीर, शांत मनासाठी तसेच स्वतः मधील नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी व्यायाम, सुदर्शन क्रिया करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य आणि उत्साह येतो. आनंद अनुभूतीतून स्वतःमधील क्षमता सिद्ध होते. योग्य निर्णय घेऊ शकतात असे प्रतिपादन शिबिराचे मार्गदर्शक धनाजी नाईक यांनी केले.
वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आर्ट ऑफ लिविंग चे आनंद अनुभूती शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
या शिबिरात मार्गदर्शक म्हणून धनाजी नाईक, सौ कमल नाईक, डॉ. महादेव पाटील यांनी काम पाहिले. चार दिवसीय शिबिरात प्राणायाम ध्यान व सुदर्शन क्रिया या बाबत माहिती व प्रात्यक्षिके करण्यात आली. विचाराची स्पष्टता, मनाची एकाग्रता, निरोगी शरीर, उच्च प्रतिकारशक्ती, नकारात्मक भावनातुन मुक्तता, तणावमुक्त व उत्साही मन, निर्मळ व कुशाग्र बुद्धी, प्रभावी निर्णय क्षमता, रागावर नियंत्रण असे अनेक फायदे आहेत.
आनंद अनुभूतीतून सुप्त गुण व संकल्प शक्तीला वाव मिळतो. प्रत्येकामध्ये अध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. यावेळी शिबिरार्थींनी चार दिवसात आलेले अनुभव सांगितले. या शिबिरात पीएसआय प्रवीण देसाई, पीएसआय सुरज पाटील, आर.डी. बोडेकर, कृषिसेवक काळे, तेजस साळुंखे, प्रशांत कुळये व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व युवक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. महादेव पाटील, संदीप मोरे, कृष्णात खुटाळे, डॉ. सुनील माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो – वैभववाडी येथे शिबिरात सहभागी नागरिक व मार्गदर्शक.

You cannot copy content of this page