संतोष कानडे यांचा इशारा;तर आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता
⚡कणकवली ता.१९-: भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्याच्या कुटुंबावर आम. भास्कर जाधव यांनी केलेले आरोप खोटे असून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आरोपांचा निषेध करत आहोत. भास्कर जाधव हे कुडाळ मध्ये येऊन राणे कुटुंबियांवर टीका करतील असे आम्हाला माहीत असते तर आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता मात्र या पुढच्या काळात राणे कुटुंबावर शिवराळ भाषेत आरोप केल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे.
भाजपाच्या कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत माजी जि.प.सभापती बाळा जठार,संदीप मेस्त्री,संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर,उमेश घाडीगावकर आदी उपस्थित होते.
संतोष कानडे म्हणाले,आम.भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये येऊन त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. भास्कर जाधव यांना एकच सवाल आहे तुम्ही जे चिपळूणमध्ये केलेले प्रकार ते उघडकीस आणण्यास आम्हाला वेळ लागणार नाही.
संतोष कानडे म्हणाले, आम.भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये वाळू चोरी करून मोठे झाले. नेते म्हणून सध्या शिवसेनेत ते मिरवत आहेत.
त्यांनी आपल्या कार्यालयात एका व्यक्तीला मारहाण केली होती . तर एका पत्रकाराला पहिल्या माळ्यावरून त्यांनी खाली ढकलले अशी व्यक्ती शिवसेनेचा नेता म्हणून मिरवते आहे . हिंदू धर्माचे आराध्य दैवत शारदा देवी मातेच्या मंदिरामध्ये त्यांनी जी लोकांना शिवीगाळ केली होती. आपल्याच लोकांना शिवीगाळ केली होती असे भास्कर जाधव आमच्या राणेसाहेबांवर शिवराळ बोलतात हे खपवून घेतले जाणार नाही. निष्ठावंत सचिन कदम याला ज्यावेळी चिपळूणचे तालुका अध्यक्ष पद घोषित झाले त्यावेळी या माणसाने धिंगाणा घातला होता. आता भास्कर जाधव याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नारायण राणे यांनी कोकणामध्ये भरपूर विकास केला आहे मात्र शरद पवार यांनी भास्कर जाधव यांना 9 खात्याचे मंत्री केले असता त्यांनी मंत्रीपदाचा किती फायदा चिपळूणला दिला ते सांगा.असा सवाल करताना संतोष कानडे म्हणाले ,आपण उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे सांगणाऱ्या भास्कर जाधव यांनी ज्यावेळी 2014 साली पहिली शिवसेनेची यादी जाहीर झाली त्या पहिल्या यादीमध्ये यांचे नाव नव्हते त्यावेळी ज्या शिव्या घातलेल्या आहेत त्या शिव्यांची क्लिप पण आपल्याकडे आहे आणि आता तेच आपले मोठेपण मिरवित आहेत कारण त्याना पक्षप्रमुख व्हायच आहे. दुसऱ्याची निंदा करून आपलले मोठेपण कधीच होत नाही. याची नोंद भास्कर जाधव यांनी घ्यायची आहे भास्कर जाधव यांचे कारनामे आम्हाला माहिती आहेत मात्र आम्ही ज्या पक्षाचे काम करत आहोत तो भारतीय जनता पार्टी एक सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही अतिरेक करत असाल तर सिंधुदुर्गाच्या जिल्ह्याच्या विरोधात बोलणाऱ्याला खारेपाटण बॉर्डरवर त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सिंधुदुर्गात येऊन अशी टीका करणार असल्याचे आम्हाला समजले असते तर तुमचा करेक्ट कार्यक्रम येथे होणार होता. त्यामुळे तुम्ही यापुढे नारायण राणे किंवा त्यांच्या कुटुंबावर बोलाल तर आम्ही गप्प बसणार नाही. नारायण राणे आज केंद्रीय मंत्री आहे आणि तुम्ही अजून त्याच जागेवर आहात. दोघांची तुलना करताना तुमची तुलना कधी होऊ शकत नाही त्यामुळे यापुढे बोलताना विचार करा असा सल्ला भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे
