*रस्सीखेच स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या सिंधुदुर्ग संघावर अन्याय

संघाने मांडली संजू परब यांच्याकडे कैफियत;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे परब यांनी दिले आश्वासन*

⚡सावंतवाडी ता.१७-: राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ देखील सहभागी होता. सिंधुदुर्गच्या संघाने उत्कृष्ठ कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारत उपविजेते पद पटकावले होते. परंतु, बक्षीस वितरण करतेवेळी सिंधुदुर्ग संघाला डावलून दुसऱ्याच संघाला उपविजेते पदाचे बक्षीस देण्यात आल्याने, याबाबत आयोजंकांकडे विचारणा करण्यासाठी गेलेल्या सिंधुदुर्ग संघाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याबाबतची माहिती रसीखेच संघटनेने सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कानावर घालताच त्यांनी याची तात्काळ दखल घेतली असून, याबाबतची माहिती त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देणार असल्याचे सांगत त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग संघाला नक्कीच न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन संजू परब यांनी दिले आहे.

यावेळी सिंधुदुर्ग रसीखेच संघाचा संजू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page