मुक्ताई अ‍ॅकेडमीने मुलांमधुन ग्रँडमास्टर घडवावा : डॉ. रोहिणी सोळंके…

मुक्ताई अ‍ॅकेडमी, आणि श्री चेस अ‍ॅकेडमी, यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबळ स्पर्धा

*💫सावंतवाडी दि.०२-:* मुलांनी अभ्यासाबरोबरच बुद्धीबळ खेळातुन आपली प्रगती करावी. अ‍ॅकेडमीने या मुलांमधुनच ग्रँडमास्टर घडवावा, असे प्रतिपादन सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांनी येथे केले. सावंतवाडीत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्ताई अ‍ॅकेडमी, सावंतवाडी आणि श्री चेस अ‍ॅकेडमी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज श्रीमंत लखमराजे भोसले, प्रमुख पाहुणे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सूर्यकांत पेडणेकर, श्री चेस अ‍ॅकेडमीचे संचालक सुशील निब्रे, श्री चेस अ‍ॅकेडमीचे संस्थापक-नॅशनल आर्बिटर श्रीकृष्ण आडेलकर, आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. मुक्ताई अ‍ॅकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यातील पंचावन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला. युवराज लखमराजे यांनी बुद्धीबळ हा खेळ आपल्या आवडीचा आहे हे सांगतानाच त्यातील बारकावे आणि काही मजेशीर गोष्टी सांगितल्या. डॉ. रोहिणी सोळंके यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युवराज श्रीमंत लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सूर्यकांत पेडणेकर, सुशील निब्रे, श्रीकृष्ण आडेलकर,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पारितोषिक विजेते पुढील प्रमाणे – खुला गट-प्रथम अभिषेक सांगळे (देवगड), द्वितीय सौरभ कानेटकर (देवगड), तृतीय बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी), चौथा अथर्व रानडे (देवगड), पाचवा तेजराज रेमुळकर (सावंतवाडी), वीस वर्षांखालील मुले-प्रथम शिवम पालव (कुडाळ), द्वितीय चिन्मय मोडक (सावंतवाडी), तृतीय मिहीर सकपाळ (देवगड), तेरा वर्षांखालील मुले-प्रथम सुश्रुत नानल (कणकवली), द्वितीय स्वानंद जोशी (कणकवली), तृतीय भावेश कुडतरकर (सावंतवाडी), वीस वर्षांखालील मुली-प्रथम जुई उबाळे (कणकवली), द्वितीय वैष्णवी तवटे (कणकवली), तृतीय पल्लवी निरवडेकर (सावंतवाडी), तेरा वर्षाखालील मुली-प्रथम विधी धामापुरकर (मालवण), द्वितीय तन्मयी सुर्यवंशी (कुडाळ), तृतीय तनिष्का आडेलकर (कणकवली) यांनी संपादन केले.

You cannot copy content of this page