जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी नाही

निरीक्षक शेखर माने: वैभव नाईकांवरील कारवाई विरोधातील मोर्चात राष्ट्रवादी सहभागी होणार

⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रवादी पक्षात कोणतीही गटबाजी नसून सर्वाची मन एकच आहेत आणी कुठे गटबाजी कुठे असेल तर ती आम्ही दूर करू असे मत सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जर महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला तर ती देखील आम्ही तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माने म्हणाले,
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाचा सभासद नोंदणी आढावा तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, वैभव नाईक यांच्या वर झालेल्या अँटी करप्शन चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असून पूर्णपणे वैभव नाईक यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

यावेळी अर्चना घारे-परब,,काका कुडाळकर,पुंडलिक दळवी,प्रफुल्ल सुद्रिक,चित्रा देसाई, रेवती राणे, सावली पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page