डॉ. सुनिलकुमार लवटे हे वंचित, निराधारांचे देवदूत

ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांचे प्रतिपादन

⚡कणकवली ता.०८ -: डॉ. सुनिलकुमार लवटे वंचित, निराधारांचे देवदूत असून महाराष्ट्रातील वंचित, निराधारांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले असे मत ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांनी व्यक्त केले.
ते माध्यमिक विद्यालय असरोंडी, कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली आणि समानवता ट्रस्ट, सिंधुदुर्ग आयोजित ‘ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. सुनिलकुमार लवटे जीवन व साहित्य’ या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय सावंत होते. प्रास्ताविक मुख्याधापक सुशांत पाटील यांनी केले.
शिरसाट पुढे म्हणाले, डॉ. लवटे यांनी साने गुरुजींचे, आंतरभारतीचे आणि महात्मा गांधींचे मानवतावादाचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे साहित्य आणि समाजकार्य दिशा दर्शक आहे.
यावेळी ‘डॉ. सुनिलकुमार लवटे यांचे जीवन व कार्य’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय सावंत, कवि कमलेश गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, माजी विद्यार्थी राजेंद्र सावंत यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन कमलेश गोसावी यांनी केले तर शेवटी प्रदीप सोनार यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page