*सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्गच्या मावळ्यांचे मोलाचे सहकार्य
*💫सावंतवाडी दि.३१-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागामार्फत दोडामार्ग तालुक्यातील हनुमंत गडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारास संस्थेच्या सदस्यांनी मातीतून बाहेर काढत मोकळा श्वास दिला. या कार्यात प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागामार्फत हनुमंत गडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारास बाहेर काढण्याचे ठरवून यासाठी गडावर मुक्कामी मोहिमांचे आयोजन करून अथक प्रयत्नाने या प्रवेशद्वाराला मोकळा केले. या दरवाजाची कमान पडलेली असून देवड्या या सुस्थितीत आहेत. या मोहिमेत संस्थेचे सदस्य सुनील राऊळ, सुधीर राऊळ, प्रकाश सावंत, रोहन सावंत, विवेक गावडे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली. त्यांना श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व फुकेरी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किल्ले हनुमंत गड हा आता संवर्धनातून पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ यांच्या सहकायाृने गडावर सतत भविष्यात संवर्धन मोहिमा राबवण्यात येणार असून गडावर नव्याने निदर्शनास आलेली तोफ आणि गावातील तोफ या दोन तोफांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ तोफगाड्यांवर विराजमान करण्यात येणार असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी सागितले. सह्याद्रीच्या कार्यात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सिंधुदूर्ग विभागाकडून जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींना करण्यात आले आहे.
