*कोरोना काळातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन

व्यापारी मेळाव्यात आमदार दिपक केसरकर यांचे आश्वासन*

*💫सावंतवाडी दि.३१-:* ३३ वा व्यापारी मेळाव्या निमित्त आमदार दिपक केसरकर बोलताना म्हणाले की, आज होत असलेला व्यापारी मेळावात सर्व व्यापारी एकत्र येतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे तसेच पुढिल वर्षी सुद्धा व्यापरी मेळावा हा सावंतवाडी व्हावा असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच कोरोना काळ अजुन संपलेला नसून याची देखील जाणीव आपण या मेळाव्याच्या माध्यमातून करून द्यावी असे देखील ते म्हणाले आहेत. कोरोना काळात अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याचे दुःख आपणाला आहे. या नुकसान ग्रस्त व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन देखील त्यानी दिले आहे. आपण कधीच व्यापारी मेळावा कधीच चुकवला नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page