Headlines

आडेली वजराट येथे टाटा सुपर गाडीत मिळाले दारूचे बॉक्स

चालकासह तीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात वेंगुर्ले पोलिसांची कारवाई

वेंगुर्ले प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली वजराट येथे गस्तीसाठी जात असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिसांनी येणाऱ्या टाटा सुपर चार चाकी गाडी ची थांबऊन तपासणी केली असता गाडी मध्ये दारूचे बॉक्स सापडले. याप्रकरणी गाडीतील चालकासह दारू व सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम 65 अ इ 81 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी गाडी चालक आरोपी युवराज दिलीप कुरणे रा.कोल्हापूर शिवाजी पेठ याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीमध्ये 91 हजार दोनशे रुपये किमतीचा दारू साठा सापडला आहे तर एम एच 09 बि सी. 9828 ही सुमारे दोन लाख किमतीची टाटा सुपर चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. आडेली वजराट तिठा येथे ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पांडुरंग खडपकर यांनी केली.

You cannot copy content of this page