तालुका कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत कार्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

*💫सावंतवाडी दि.३०-:* तालुका कॉंग्रेस कडून कॉंग्रेस कार्यालयात आज जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करत आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी, कॉंग्रेस महिला तालुका अध्यक्ष स्मिता इंगळे, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, मौसिम मुल्ला, राकेश चीतारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page