सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे प्राप्त निधी मागे जाण्याची शक्यता

खासदार नारायण राणे : सप्टेंबरमध्ये निधी खर्च होणे अपेक्षित

*💫सिंधूदुर्गनगरी दि.३०-:* त्यावेळी चिपी विमानतळसाठी जमीन संपादन करीत असताना विरोध करणारे आताचे खा विनायक राऊत त्याच विमानतळ उद्घाटनाच्या तारखा शोधत आहेत. मात्र, रस्त्यासाठी आवश्यक ३२ कोटी हे सरकार देवू शकले नाहीत. रस्ते व पाणी या मूलभूत गरजा भागवु शकले नाहीत. सिंधूदुर्ग जिल्ह्यात निधी आणला नाही. आता निधी आलाय. हा निधी एप्रिल महिन्यात प्राप्त होवून सप्टेंबर महिन्यात खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप ती प्रक्रिया सुरु झालेली नाही. परिणामी ३१ मार्च रोजी हा निधी मागे जाणार आहे, असे खा नारायण राणे यानी सांगितले. पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना खा राणे यानी लाल किल्ल्यावरिल भारत ध्वज उतरवित खालिस्तानचा ध्वज लावण्यात आला. हे शेतकरी आंदोलन करणाऱ्या १६ राजकीय पक्षाना योग्य वाटते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिबा दिला असला तरी अन्य पक्षाप्रमाणे आंदोलनात सहभागी झाली नाही, याकडे लक्ष वेधले असता शिवसेनेचा पाठीबा अंडरग्राउंड होता. मातोश्रीवरुन बटन दाबले गेले की ते सहभागी होतात, असा टोला मारला.

You cannot copy content of this page