⚡मालवण ता.०३-: मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील प्रतिष्ठित सामजिक कार्यकर्ते गणपत दादू परब वय ७४ वर्ष यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
गणपत परब यांचे मुंबई तसेच गावातील विविध संस्था तसेच सोसायटी मध्ये योगदान होते. मसुरे पतपेढी मुंबई चे माझी अध्यक्ष, परब मराठा मंडळाचे सभासद, बागवे संस्थानचे सभासद, मसुरे येज्युकेशनचे सभासद होते तसेच नाट्य कलावंत, क्रीडक्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते.
त्यांच्या निधनाने सामजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, चुलत भाऊ, एक मुलगा, दोन मुली, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. तुषार परब यांचे ते वडील होत.
